खामगाव : आज शहरातील ३ कोरोना संशयीतांचा मृत्यू झाला आहे. तर प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार शहरातील विविध भागातील २३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.
शहरालगत असलेल्या वाडी भागातील दगडू लहासे वय ८० व ७० वर्षीय वृद्धेवर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. तसेच शहरातील बालाजी प्लॉट भागातील रहिवाशी तसेच स्वामी समर्थ कॉम्लेक्सस्थीत बॉईज झोन हेअर सलूनचे संचालक कांतीलाल माधव धामेलीया वय ७५ यांचा सुद्धा अकोल्यात कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी धामेलीया कुटुंबातील काका-पुतण्याचा सुध्दा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे धामेलिया कुटूंबातील तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
सोमवारी, दुपारी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार, तलाव रोड ६, अभंग कॉलनी १, बोबडे कॉलनी१, समन्वय नगर १, यशोधरा नगर १, अधिक ३ असे १३ रुग्ण तसेच तालुक्यातील सुटाळा १, नांदुरा २, गारडगाव २, बोरजवळा ४ व घाटपूरी येथील १ असे १० रुग्ण आढळून आले आहेत. त्त्यामुळे शहरातील आतापर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६५ वरून ९७८ वर तर तालुक्यातील संख्या ३४० वरून ३५० पर्यंत पोहचली आहे.
तर त्यामुळे शहरासह तालुक्यातील एवूâण रुग्ण संख्या १३०५ वरुन १३२८ वर पोहचली आहे. तर आता पर्यंत खामगाव शहरासह तालुक्यातील मृतकाची संख्या २५ वरुन २८ पर्यंत पोहचली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.