खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव समर्पण दिन साजरा

0
156

सेवाभाव व समर्पण हा भाजपा कार्यकर्त्यांचा जीवनाचा ध्यास असावा – आ. रणधीरभाऊ सावरकर

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला : माजी केंद्रीय मंत्री नामदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि 26 फेब्रुवारी 2022 रोजी आ गोवर्धनजी शर्मा, आ रणधीर भाऊ सावरकर, आ वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, किशोर मांगटे पाटील,माधवराव मानकर, हरिभाऊ काळे,युवा नेते अनुपजी धोत्रे,ऍड सुभाषसिंग ठाकूर, महानगर सरचिटणीस अक्षयजी गंगाखेडकर, डॉ विनोदजी बोर्डे, संजयजी जीरापुरे, संजयजी गोडा, संजयजी गोटफोडे , ऍड देवाशिष काकड  यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पूर्व मंडळ मध्ये सेवाभाव समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी सकाळी आठ वाजता बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात आली तसेच विविध ठिकाणी स्वच्छता अभियान ,रक्तदान शिबिर, राशन कार्ड शिबिर, आधार कार्ड नोंदणी शिबिर, ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर, अन्नदान ,सूर्योदय बाल आश्रमामध्ये फळवाटप यासारखे अनेक लोकाभिमुख कार्यक्रम सेवा समर्पण दिन म्हणून आदरणीय खासदार श्री संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. याप्रसंगी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सेवा व समर्पण हे गुण आत्मसात करून जन लोकांची सेवा करावी व अंत्योदय चे अंतिम उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन केले.भाजपा पूर्व मंडळाच्या सर्व सेवाभावी कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाच्या पूर्व मंडळाचे सर्व सन्माननीय नगरसेवक पूर्व मंडळाचे पदाधिकारी शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या सर्व कार्यक्रमांना महानगराचे योगेश मानकर, सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संतोष शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, आकाश ठाकरे,अभिजित कडू,केशव हेडा, उज्वल बामनेट, मोहन पारधी, निलेश काकड, यश अग्रवाल, हेमेन्द्र सुनारीवाल,सौरभ धानोकार,शिवम ठाकूर, शुभम चंदन, रवी यादव व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleपारदर्शी नेतृत्वाचे धनी, सेवाभावी समर्पण नेतृत्व… खा. संजयभाऊ धोत्रे !
Next articleखा. संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरात कचरापेटीचे वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here