व-हाड दूत विशेष
राजकारण आणि समाजकारण याचा नातं काय आहे? हे आपल्या नेतृत्वातून प्रत्यक्षपणे जनमाणसात रुजविणारी व्यक्ती म्हणजे जिल्ह्याचे खासदार संजयभाऊ धोत्रे.
केंद्रीय राज्यमंत्री असताना covid-19 च्या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश चे कामगार अकोल्यात अडकले ही बातमी मिळाल्याबरोबर त्यांच्या निवासाची व्यवस्था करून कामगारांच्या साठी निर्माण करणे तसेच देशाचे पहिले शिक्षण राज्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल करण्याचा आराखडा त्यांच्या काळात निर्माण झाला व देशाची शिक्षण प्रणाली संदर्भात देश-विदेशात प्रचार व प्रसार करण्याची सौभाग्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांना प्राप्त झाले आहे. आरोग्य सेतू ॲप निर्माण करून covid-19 च्या काळात अकोल्यात ऑक्सीजन प्लांट ची गरज लक्षात घेऊन सर्वात आधी उभारणी करून अकोल्यात ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या सातत्याने लोकप्रतिनिधी तसेच डॉक्टर्स यांची संवाद साधून तसेच समाजातील सर्व स्तरातील आपली प्रकृती बरोबर नसतानासुद्धा अकोलेकरांची प्रकृती चांगली असावी यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासाठी जिल्हाधिकारी पासून तर आरोग्य विभागाचे अधिकारी थेट संपर्क साधणारे लोकनेते म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबुत करण्यासाठी विविध सीआरसी फंडच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून दिले. वेगवेगळे आरोग्य शिबिर, रक्तदान चळवळ उभारणी करून त्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. केंद्रीय राज्यमंत्री असताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अकोला-नांदेड रेल्वे विद्युतीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे खंडवा-अकोला रेल्वे सुरु व्हावी ही यांची महत्वाकांक्षी योजना असून यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये राज्य शासनाने अडथळा निर्माण केल्यामुळे केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यावर सुद्धा ते काम थांबले आहे. अकोट ते अकोला ही रेल्वे सुरू व्हावी यासाठी अकोट रेल्वे स्थानकावर विशेष व्यवस्था व्हावी यासाठी दक्षिण मध्य रेल्वेशी सातत्याने सध्या संपर्कात आहे. संपूर्ण जीवन सेवाभाव समर्पण म्हणून त्यांनी जगले समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा आपल्याकडे येणाऱ्या नागरिकाला मदत करता यावी तसेच त्याचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. जात-पात धर्म-पक्ष पेक्षा मानवता धर्म त्यांनी स्वीकार केला. ज्येष्ठांचा सन्मान चांगल्या गुणांचा स्वागत, गौरव करण्याची परंपरा व सत्य असलेली बाब स्वीकार करणे आणि खरं बोलणे ही त्यांची विशिष्ट असल्यामुळे चाहता वर्ग सर्व क्षेत्रात आहे. संपूर्ण जीवन सेवा-भाव समर्पण म्हणून अंगीकार करून समाजकारण-राजकारण अर्थकारण सहकार क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केले त्यांना दीर्घायुष्य लाभो व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा म्हणून त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाची प्रगती व्हावी व शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात.
समाजकारण हा राजकारणाचा पाया ढासळतो कि काय? अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची भिती लोकांमध्ये आहे. जात, पक्ष, धर्म, पंथ अशा विखुरलेल्या मानसिकतेत लोकांचा वावर वाढला असल्याने परस्परातील प्रेम, आपुलकी, विश्वास कमी होत मानवतेचे भावबंधन तुटणार कि काय? अशी भ्रमित अवस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुभवास येते. अशा सर्व परीस्थित सामाजिक सलोखा व विकास या दोन्ही गोष्टींचा संगम साधून राजकारणातून भेदाभेद निर्मुलन करून पारदर्शी नेतृत्वाचे धनी अशी प्रतिमे संजय धोत्रे यांना परंपरेने लाभली आहे. माणसाने जीवनात सुसंवाद व कालानुरूप बदल अंगीकारणे किती महत्वाचे आहे ही त्यांची शिकवण त्यांचे जीवनशैलीतून सतत दिसून येते. भाजपाच्या पारदर्शी व विकासाच्या सैद्धांतिक यशाचे प्रतिक आहे. हीच पारदर्शिकता व विकास संजयभाऊ धोत्रे यांची जीवन शैली असल्याचा प्रत्यय अकोलाकारांना असल्यामुळे जिल्ह्यात मोठा चाहता वर्ग कृतीने त्यांनी निर्माण केला आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस म्हणजे सर्वांगानी ग्रामीण शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण जीवनमान व ग्रामविकासाची नाळ ओळखत ग्रामीण राजकारण सशक्त करून भारतीय जनता पक्ष हा शहरी पक्ष आहे ही ओळख विस्तारत पक्षाला ग्रामीण चेहरा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व जेष्ठ नेत्यांच्या मार्गर्दर्शनात त्यांनी दिला. त्याची फलनिष्पती म्हणजे राज्यात भाजपाला नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीद्वारे शहरी व ग्रामीण भागाचा मिळालेला पाठींबा, शहर-गाव-खेडे-वाडी-वस्ती अशा मार्गाने होत असलेला भाजपाचा प्रवास म्हणजे अखंड भारताचे दर्शन ही पक्ष प्रवासाची कडी त्यांच्या वक्तव्य बोलण्यातून त्यांच्या एका नवीन राजकीय संस्कृतीची जनमनावर छाप पडते, आणि या सूत्रानुसारच जिल्ह्याचे नेतृत्व ते सातत्याने करीत आहेत. विकास साधत असतांना पर्दार्शिकतेचे महत्व काय आहे याचा परिपाठ त्यांनी पक्षपातकी पासून सामान्यांपर्यंत समस्तांना कृतीने दिला आहे व यासाठी सतत आग्रही भूमिका घेऊन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करून जो खरा असेल त्याचे पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची कला जन्मजात त्यांच्या जीवनशैलीत वारंवार राजकारण व समाजकारण करतांना दिसून येते. अकोला शहराचा विकास साधतांना प्रचंड सुंदर रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे मीटर गेज चे ब्रॉड गेट मध्ये रूपांतरण,खारपान पट्टा विकास, विमानतळ विस्तारीकरण, साठी प्रयत्न सांस्कृतिक भवन पासून मुलभूत सोयी सुविधा निर्माण करण्यापासून ग्रामीण भागाचा विकास, शेती आधारित उद्योग धंदे, शेती, केंद्रित अर्थ व्यवस्था व समाज व्यवस्था या सर्वांची सांगड घालत एक सक्षम व आदर्श पारदर्शी नेतृत्व ही गुण ना. नितीन गडकरी, ना. देवेंद्र फडणवीस, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांचेकडून घेऊन त्यांनी सिद्ध केले. शिवाय राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या प्रचंड याशाद्वारे जनतेने संजयभाऊ धोत्रे यांचे पारदर्शी नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचे नेतृत्वाचे खंबीर आधारस्तंभ म्हणजे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर,आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल हे आमदार द्वय सुद्धा पारदर्शिकता व विकासाचे सच्चे पायिक त्यांचे मार्गदर्शनात लोकविकासात स्वतःला झोकून देतांना दिसतात. मागील 30 वर्षांवर नजर टाकली तर दिसून येईल की दोन वेळ सोडले तर संजयभाऊ धोत्रे यांचे जिल्ह्यात अबाधित नेतृत्व जनतेने जनतेने स्वीकारले आहे. राजकीय कलह असो वा सामाजिक असंतुलन या दोहोंचा मुकाबला धर्याने व संयमाने कसा करावा, विकास व एकोपा कसा टिकवावा यांची मूर्तिमंत शिकवण त्यांचे नेतृत्वाने सतत मिळाल्याने जिल्ह्यात भाजपाची विकासात्मक राजकीय संस्कृती त्यांनी वेगळी निर्माण केली. जिल्ह्यात नगर परिषद अकोटच्या नगराध्यक्ष पदी विराजमान केलेलं जेष्ठ नेते श्री हरिनारायण माकोडे, अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत तरुण महिला नगर सेविका, सोनी अहुजा यांची निवड म्हणजे त्यांचा राजकीय व विकासाच्या दृष्टीचि ओळख पटवितात. स्मरण करून देण्याचा सारखा ……… म्हणजे अकोला मनपाच्या निवडणुकीत जाहीर सभेत प्रचारासाठी आलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ५० नगर सेवक निवून आणून महापालिकेत भाजपची एक हाती निर्वावाद सत्ता स्थापन करण्याची खात्री दिली हा त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या नेतृत्व व लोकप्रतिनिधीची खात्री पटविणारा आहे.
सहकार व भाजपातील जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आदर ठेऊन प्रत्येकाचे मत जाणून राजकारण व समाज क्षेत्रामध्ये राजकीय मतभेद विसरून एक मित्र परिवार सर्व जाती जमातीमध्ये निर्माण करून राजकारणात खरा बोलणारा अशी प्रतिमा निर्माण करून खा. धोत्रे निर्भीड व विकासशील पारदर्शि नेतृत्व असल्याचा ठसा समाजात त्यांनी निर्माण केला आहे. आज त्यांच्या वयाला 63 वर्षे पूर्ण होत असून त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला नमन व ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो व समाजात, राजकारणात पारदर्शी कारभाराला गती मिळून पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांची समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये पर्दार्शिकता निर्माण होऊन साबका साथ साबका विकास ही संकल्पना यशस्वी ठरण्यास बळ मिळो हीच सदिच्छा ! आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस सेवाभाव समर्पण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन अन्नदान अभिषेक स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर वेगवेगळे सामाजिक दायित्व व समाज उपयोगी कार्य करून आपल्या लाडक्या प्रेरणादायी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहणाऱ्या खासदार संजय धोत्रे यांच्या वाढदिवस त्यांना समर्पित अभिप्रेत कार्य करून साजरा करत आहे ही त्यांची लोकप्रियता व समाजाविषयी असेल असलेली आपुलकी सिद्ध होत आहे.
- गिरीश जोशी, भाजपा प्रसिद्धी प्रमुख, अकोला
9422161556