व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट जिल्हा परिषद शिक्षक पंचायत समिती अकोट यांच्या द्वारा आयोजित द्वितीय राज्यस्तरीय इतिहास परिषदेचे आयोजन दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आले होते .गडकोट ,किल्ले ,स्थापत्य ,शिलालेख ,लेणी ,ताम्रपत्रे अशा विविध विषयावर इतिहासावरील संशोधन करणाऱ्या अभ्यासकासाठी ही सुवर्णसंधी संतोष झामरे शिवतीर्थ प्रतिष्ठान आकोट यांनी उपलब्ध करून दिली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ह.भ.प. वासुदेवराव महल्ले अध्यक्ष (श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट) उदघाटक मा. डॉ. रणजीत पाटील, विशेष अतिथी प्राचार्य डॉ प्रशांत कोठे .प्रमुख मार्गदर्शक मा. डाॅ.मंजुश्री जयसिंगराव पवार प्रसिद्ध इतिहास संशोधक कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. मा. प्रशांत कोठे प्राचार्य जिजामाता महाविद्यालय बुलढाणा ,मा.दिलीप तायडे माजी उपशिक्षणाधिकारी अकोला, श्री गजानन सावरकर शिक्षण विस्तार अधिकारी अकोट . प्रा डॉ.अनघा साेनखासकर प्रा डॉ. मेघना पोटे,प्रा गणेशराव अंबाडकर
इत्यादी मान्यवरांचीउपस्थिती होती. या दिमाखदार सोहळ्याचे युगल सुत्रसंचालन शरद झामरे व रूपाली झामरे यांनी केले होते .कार्यक्रमाचा दुग्धशर्करा योग म्हणजे या निमित्ताने इतिहासकार श्री संतोष झामरे सर लिखित शिवशाहीच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले होते. पुस्तकाला प्रख्यात व ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. शिवशाहीच्या पाऊलखुणा याची हुबेहुब व आकर्षक रांगाेळी कु अश्विनी बाेंडे ,मेघा झामरे,साै.संगीता झामरे यांनी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जि प शाळा किनखेड पुर्णाच्या विद्यार्थ्यांनी इतिहासावर आधारीत सुंदर परिपाठाचे सादरीकरण केले . पुस्तकाच्या प्रस्तावनेचे वाचन डिंगाबर खडसे यांनी केले .यावेळी महाराष्ट्रातील गडकोट,ऐतिहासीक ठेवा जतन करण्यासाठी,त्याचे महत्त्व येणाऱ्या पिढ्यांना व्हावे ह्या हेतूने झटणाऱ्या इतिहास अभ्यासकांना शिवभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्यें रांजणगाव पुणे येथील श्री विठ्ठल देशमुख, प्रशांत पब्लिकेशन जळगांव चे श्री प्रदीप पाटील,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील प्रा. डॉ अनंत मरकाळे व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चांदूर चे श्री शिवा काळे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता.या संदर्भातील परिचय कार्य वाचन चंद्रशेखर महाजन यांनी केले . कार्यक्रमाकरिता तांत्रिक सहकार्य आनंद नांदुरकर यांचे लाभले. मंजुश्रीताईंनी आपल्या अमाेघ वाणीतून देवगिरी पासून शिवशाहीपर्यंतचा काळ सप्रमाण मांडून रसिकांना खिळवून ठेवले व मने जिंकली. या कार्यक्रमाला विष्णू झामरे, भास्कर इंगळे ,निलेश काळे ,मंगेश दसाेडे, अनिल सावरकर, दत्ता तळोकार,विनाेद शिवरकर, घोंगडे ,महेंद्र काकड,,प्रवीण सिरस्कार , गोपाल झामरे इत्यादी अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले.