वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला: येथील पत्रकार कॉलनी न्यू बस स्टँड येथे शिवजयंती मोठ्या आनंदात साजरी झाली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगराचे संघटन सचिव संदीप तायडे यांनी केले होते. सुरुवातीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हरिदास भदे, ज्येष्ठ नेते श्याम भैय्या अवस्थी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रा. विश्वनाथ कांबळे, महाराष्ट्र प्रदेश प्रदेश प्रतिनिधी प्रा. विजय उजवणे, महानगर संघटन सचिव पापा चंद्र पवार, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव बाबासाहेब घुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभागातील ज्येष्ठ नागरिक विजय खत्री होते. यावेळी उद्योजक श्री पांडे, सामाजिक कार्यकर्ते नाना इंगळे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष के .सी बागडे, योगेश हुमणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सेवा दल महानगर उपाध्यक्ष विजय पाटील आदी मान्यववरांची शिवजयंतीनिमित्त भाषणे झाली. कार्यक्रमासाठी रवी बुलबुले, अजय बोरकर, प्रा,सतीश जुमडे ,राहुल बामणे यांच्यासह शिवभक्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.