मुंबईत पार पडला पुरस्कार वितरण सोहळा
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: माजी समाज कल्याण व महिला बाल कल्याण मंत्री तथा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बबनराव (नाना साहेब ) घोलप यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 645 व्या जयंती निमित्ताने मुंबई येथे पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रातील विभागनिहाय निवड करून उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष कार्य गौरव पुरस्कार वितरण राज्याचे माजी समाज कल्याण व महिला बालकल्याण, शिवसेना उपनेते तथा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले, अमरावती विभागातून अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रविण चोपडे यांचा उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष म्हणून सत्कार करण्यात आला. त्यामध्ये मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व रोख रक्कम देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव उमाकांत डोईफोडे, प्रमुख राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार, प्रदेश सरचिटणीस डॉ शांताराम कारंडे, प्रदेश कार्याध्यक्ष तथा विदर्भ प्रमुख गजानन भटकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, मुंबई महानगर पालिका शिक्षण अध्यक्षा संध्या दोषी, राष्ट्रीय उपाध्यक्ष संगीता वाघमारे,पश्चिम युवा प्रमुख रामा उंबरकर लेदर उद्योजक वामन ढाकरे, राष्ट्रसंत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्था सचिव सौ मंगला चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.