जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अकोट वनजीव विभाग अंतर्गत शहानुर व वसाली गेट शासनाच्या आदेशानुसार पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते. तथापि कोविड-19 चा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यातील
शहानुर व वसाली गेट पुर्ववत सुरु झाले आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण केलेल्या पर्यटकानाच संरक्षित क्षेत्रात वनपर्यटनाकरीता प्रवेश सुरु राहिल. तसेच पर्यटन गेटवर लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहिल, अशी माहिती मेळघाट वन्यजीव विभाग, अकोट उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे.