वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: बिल्डिंग पेंटर व इतर संघटित मजूर संघाच्या अकोला पूर्व च्या अध्यक्षपदी सचिन खराटे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात असंघटित क्षेत्रातील कार्यक्रम खऱ्या बांधकाम कामगारांची संघटना म्हणून नावलौकिक असलेली संघटना ही बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून संवाद मिळावे जनजागरण अभियान व त्यांच्या प्रश्नावर लढा देत असते या संघटनेचे काम महाराष्ट्र भर पसरले आहे. या संघटनेचे काम जनसामान्य कामगारांपर्यन्त पोहचवण्यासाठी जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे येथील सचिन खराटे यांची संघटनेच्या अकोला पूर्व अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सचिन खराटे यांचा तालुक्यातील मजुरांशी संपर्क पाहता त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी ही निवड केली आहे.