व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने स्थानिय कौलखेड चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य छत्रपती शिवाजी महाराज विचार जनजागरण सोहळा आज १७ फेब्रुवारीरोजी संध्याकाळी
संपन्न झाला.
शिवाजी महाराज जयंती पर्व वर आयोजित व समिती चे अध्यक्ष निरंजन पावसाळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या जनजागरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनपा सभागृह नेता योगिता पावसाळे,नगरसेवक पंकज काळे,मंगला सोनोने,धनंजय धबाले,सिद्धार्थ वरोठे,पंकज साबळें,वक्ता सौरभ वाघोडे,गणेश पावसाळे,लखन गावंडे,समिती कार्याध्यक्ष पवन महल्ले,समितीचे सचिव चंद्रकांत झटाले,शोभायात्रा प्रमुख पंकज जायले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमचा प्रारंभ चौक मध्ये स्थापित छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस हारार्पण व सामूहिक अभिवादनाने करण्यात आला.या जनजागरण कार्यक्रमात वक्ता सौरभ वाघोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर विचार व्यक्त करून तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून समाजाला नवीन दिशा देण्याचे आवाहन केले. जयंती उपक्रमात आज 17 फेब्रुवारीरोजी सहकार नगरच्या शिवस्मारक परिसरात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दु 2 वाजता शिवाजी महाविद्यालय येथे करियर गाईडन्स शिबिर पार पडले. तर उद्या 18 फेब्रुवारीरोजी दुपारी 3 वाजता शिवाजी महाराज पार्क येथे महिलांवर्गची भव्य रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री 8 वाजता पार्क परिसरात भव्य दीपोत्सव साकार करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करीत संपन्न या जनजागरण कार्यक्रमाचे संचालन व आभार सुहास धोटे यांनी मानले.यावेळी अविनाश राऊत, नितीन राऊत,बालासाहेब मांडवे,संजय झाडोकार, अभिजित बांगर,संदीप पावसाळे,अभिजित मूळे, प्रधुमन ढोरे,अक्षय चतरकर,योगेश ताथोड,सचिन म्हात्रे,मोहन पाटील,सचिन कराळे,गजानन सोनोने,अर्जुनराव वाडेकर समवेत उत्सव समितीचे पदाधिकारी,युवावर्ग व नागरिक उपस्थित होते.