व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: येथील रेल्वे स्टेशन चौकातील एका हॉटेलवर बालकाकडून काम करवून घेणा-या हॉटेल संचालकाविरुद्ध रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून रामदास पेठ पोलिसांनी महावीर भोजनालय संचालक रविंद्र जैन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कामगार उपआयुक्त नि.पां. पाटणकर यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांचे मार्गदर्शनाखाली कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी आज 17 फेब्रुवारीरोजी अकोला रेल्वे स्टेशन चौकातील महावीर भोजनालयामध्ये छापा टाकला. यावेळी जिल्हा बालकामगार कृती दला एक बालकामगार काम करतांना आढळून आला. त्याची मुक्तता करून आस्थापना मालक रविंद्र जैन अकोला विरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून रविंद्र जैन यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.