व-हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव : साप्ताहिक ‘सातपुडा हेडलाईन्स’ च्या वतीने आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी ‘स्वप्नपूर्ती’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या विशेषांकाचे विमोचन खामगाव येथील विश्राम गृहावर आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर, राज्याचे भाजपा सोशल मिडीया सेलचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर, एलआयसीचे विकास अधिकारी रामदादा भेलके, महेंद्रजी रोहणकार, नगेंद्रजी रोहणकार, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अभिलाष मुऱ्हे, भाजपा शेगाव तालुकाध्यक्ष विजयजी भालतडक, भाजयुमो खामगाव तालुका उपाध्यक्ष प्रविणकुमार ढोरे, योगश आळशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी खामगाव मतदारसंघाच्या विकासासाठी स्वप्ने पाहिली. त्यापैकी जी कामे आमदार अॅड. आकाशदादांच्या मार्गदर्शनात पुर्णत्वास गेली आहेत अथवा पुर्णत्वास जात आहेत, अशा विविध कामांचा आढावा ‘सातपुडा हेडलाईन्स’ च्या ‘स्वप्नपूर्ती’ विशेषांकात घेण्यात आला.