वेल्डिंगच्या दुकानात भीषण स्फोट, 2 गंभीर

0
233
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे स्थानिक आठवडी बाजारात राज्य मशामार्गाला लागून गजानन यादवराव विडोळे यांचे गॅस वेल्डींगचे दुकान आहे दि ३ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान गजानन विढोळे यांनी त्यांच्या दुकाना मधील कार्बेट ६० किलो व ऑक्सिजन सिलेंडर व दुकानाच्या आत मध्ये स्कुटीने अचानक पेट घेतला. झालेल्या स्फोटामुळे शेजारील दुकानाचे मालक सलीम खान ताज खान वय ५० व मुलगा आवेज खान सलीम खान वय २५ वर्ष हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मेहकर येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले तर १३ दुकानदारांचे  ६ ते ७ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

डोणगाव येथील आठवडी बाजारात जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर ग्राम पंचायत कॉम्प्लेक्स च्या शेजारी राज्य महामार्गाला लगत गजानन यादवराव विढोळे यांचे गॅस वेल्डींगचे दुकान असून या दुकाना मध्ये ३ फेब्रुवारीच्या दुपारी २ वाजता आग लागल्याची घटना घडली. या गॅस वेल्डींगच्या दुकानात ६० किलोच्या जवळपास कार्बेट व एक ऑक्सिजन सिलेंडर ,घरघुती गॅस सिलेंडर व मिनी गॅस सिलेंडर असे ज्वलनशील स्फोटक असे साहित्य होते. अश्यात गजानन विडोळे याने लावलेल्या आगीने रुद्रारुप घेतले व अश्यातच ज्वलनशील वस्तुनि पेट घेऊन त्याचा मोठा स्फोट झाला त्या स्फोटाचा आवाज एक किमीच्या जवळपास ऐकू आला यात ऑक्सिजन सिलेंडरचे व त्याच्या दुकान उडाले यात सिलेंडरचे व दुकानाचे लोखंडी साहित्य उडाल्याने परिसरातील १३ दुकाने शातीग्रस्त झाली सदर घटनेची माहिती मिळल्यावर पोलिसांनी त्वरित उपाय योजना करत ट्राफिक थांबवून घेतली तर लोकांना घटनास्थळा पासून दूर ठेवले व मेहकर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले या स्फोटाचे आवाज आल्याने गावातील जनता घटनास्थळी आली तर तेव्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून त्या ठिकाणी असलेले दुसरे सिलेंडर फुटून पुन्हा दुर्घटना होऊ नये यासाठी जनतेला जवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला घटनास्थळी महसूल विभागाने भेट देऊन पंचनामा केला हा पंचनामा शिवप्रसाद म्हस्के,ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे,प्रशासक संदीप मेटागळे,आमदार संजय रायमूलकर,माजी सभापती निंबाजी पांडव,कृषी सभापती राजेंद्र पळसकर,खरेदी विक्री संघाचे भगवंतराव देखमुख,तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर,सोशल मिडिया अब्रार खान ,पंजाबराव मेटागळे आदींनी घटनास्थळी पाहणी केली या वेळी आमदार रायमूलकर यांनी दोषींवर कडक कार्यवाही करून शातीग्रस्त दुकानदारांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
Previous article10 वी – 12 वी परिक्षा ऑफलाईनच होणार
Next articleआमदार अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित ‘स्वप्नपूर्ती’ विशेषांकाचे विमोचन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here