वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: आपल्या जवळपास तीन वर्षाच्या अकोला जिल्हा परिषदेतील कार्यकाळात एक कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केलेले दिलीप तायडे यांना जि. प. वरिष्ठ प्राथ केंद्र शाळा किनखेड पूर्णा येथे सेवा पूर्णत्वा बद्दल भावपूर्ण निरोप देण्यात आला.
31 जानेवारी रोजी त्यांची ऑफिस मध्ये उपस्थिती आवश्यक असतानाही त्यांनी शाळा आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासोबत हितगुज करून आपली सेवा ही व्रतासारखी पूर्ण केली. आपल्या कार्यकाळात त्यांनी सतत शाळा भेटी देवून शिक्षकांना सदैव प्रोत्साहन दिले. उपक्रमशील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.शाळा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांच्यातील शिक्षक त्यांनी शेवट पर्यंत जिवंत ठेवला. असे हाडाचे शिक्षक असलेले उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार मुख्याध्यापक संजय सरदार यांनी केला. तेव्हा सर्व विद्यार्थी आणि शिक्षक भावूक झाले होते. याप्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार अभियानात सहभागी होवून आमच्या शाळेची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल साहेबांनी अभिनंदन केले. त्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या सौ नूतन देशपांडे मॅडम आणि विनोद शिवरकर सर यांचा साहेबांनी पुष्प गुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अकोला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रतन सिंग पवार, विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र भास्कर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप ओइंबे, उपाध्यक्ष सतिश इंगळे, केंद्र प्रमुख सय्यद रब्बानी, शिक्षिका सौ नूतन देशपांडे, सौ संगीता म्हैसने, शिक्षक संतोष झामरे, सचिन राजपूत,श्री बाळकृष्ण वसतकार विनोद शिवरकर यांची उपस्थिती होती.