व-हाड दूत न्यूज नेटवर्क
आज २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनी ७५ करोड सूर्यनमस्कार से राष्ट्रवंदन’ या राष्ट्रीय स्तरावरील थेट प्रक्षेपित कार्यक्रमात ‘जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, किनखेड पूर्णा’ने कृतिशील सहभाग घेत अकोला जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य, राष्ट्र, जिल्हा स्तरावर अनेक विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच ७५ करोड सूर्यनमस्कार से राष्ट्रवंदन या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, किनखेड पूर्णा, ता. अकोट, जि. अकोला येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सतत एकवीस दिवस प्रतिदिन तेरा सूर्यनमस्कार घालून विद्यार्थ्यांनी सराव केला होता. आज प्रजासत्ताक दिनी संपूर्ण भारतभर थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन एकाच वेळी लाखो भारतीयांसोबत सूर्यनमस्कार घालून या सुंदर कार्यक्रमात अकोला जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप ओइंबे, उपाध्यक्ष सतिश इंगळे व सर्व सदस्य, केंद्रप्रमुख सय्यद रब्बानी आणि गावातील प्रतिष्ठित बंधुभगिनी उपस्थित होते.. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय सरदार, सहाय्यक शिक्षक संतोष झामरे, श्री. राजपूत, श्री. वसतकार, सौ. संगीता म्हैसने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणुन सौ.नुतन देशपांडे तर तांञिक विभाग श्री.विनोद शिवरकर यांनी सांभाळला.