व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या संजय प्रांजले या पोलिस कर्मचा-याने एका महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी संजय प्रांजले विरुद्ध आज २६ जानेवारीरोजी संध्याकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिस कर्मचारी व तिचा पती आधी एकाच ऑफिसमध्ये काम करीत होते. ज्या माध्यमातून आरोपीसोबत महिलेची आेळख झाली. नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेसोबत तो पोलिस कर्मचारी अत्याचारपिडीत महिलेच्या घरी आला व तिच्यावर त्या महिलेसमोर अनैसर्गिक अत्याचार केला. अशा तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचा-याविरुद्ध कलम 376 (2), अ 377, 417, 323,५०६ भादविनुसार गु्न्हा दाखल केला आहे.