युवा पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: गेल्या वर्ष दीड वर्षापासुन अडचणीत असलेल्या महिला बचत गटाना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने संक्रांत महोत्सव या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या महोत्सवाचा स्थानिक स्वराज भवन प्रांगणात बुधवारी थाटात प्रारंभ करण्यात आला.
माजी मंत्री अजहर हुसेन यांच्या हस्ते व सौ. संजीवनीताई बिहाडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या उत्सवाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, सावित्रीमाई फुले, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन तथा दिप प्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमात सांस्कृतिकतेची भर पाडीत नृत्यनंद कला केंद्राच्या प्रियंका जोशी यांच्या चमुने गणेश वंदना नृत्य सादर करीत भर पाडली. यावेळी युवा दिनाचे औचित्य साधुन युवा पुरस्काराचे वितरण सुध्दा करण्यात आले. यात
यात डीएसपी पानीपुरीचे स्वप्निल तायड़े, मेकअप आर्टिस्ट शरद भूयार, विठ्ठल माळी, वंदना सराग,
छायाचित्रकार प्रवीण ठाकरे, छायाचित्रकार नीरज भांगे, गुलाबजाम भोजनालय संचालिका स्वानंदी पांडे, चैतन्य गोमासे, आकांक्षा गोमासे आदींना सन्मानित करण्यात आले. या भव्य महोत्सवाचे आयोजन काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ पूजा काळे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी डॉ.अभय पाटील, मदन भरगड, प्रकाश तायड़े, प्रशांत गावंडे, राजेश भारती, डॉ.झिशान हुसैन, महेश गणगणे, नारायण चिंचोळकर, पुष्पाताई देशमुख, अर्चना राऊत,विभा राऊत,सुमन भालदाने,आकाश कवडे,महेंद्र गवई,रवि अरबट,अंकुश तायडे,अभिलाष तायडे,सुरेश ढाकोलकर आदी उपस्थित होते. या दोन दिवसीय महिलांच्या प्रदर्शनात अनेक गृहपयोगी साहित्याचे स्टॉल लावण्यात आले असून विविध क्षेत्रातील महिलांनी या प्रदर्शनास भेट देत या उपक्रमाचा लाभ घेतला. संचालन सागर कावरे यांनी तर आभार प्रदर्शन आकांशा गोमासे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आकांक्षा गोमासे,स्वानंदी पांडे,अंकुश भेंडेकर,प्रवीण काळे,मंगेश वानखड़े,वंदना गोमासे,
कार्तिक पोधाडे आदी प्रयत्न करीत आहेत. कोविड नियमांचे पालन करून आयोजित या प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.