समाजकार्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

0
161

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

— ब्लॅकमेलकरून केली मारहाण

— घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार

अकोला : शहरातील खदान परिसरातील एका 39 वर्षीय विवाहितेशी सामाजिक कार्यात ओळखीने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशन येथे मारहाण, विनयभंग, ब्लॅक मिलिंग, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खदान पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

खदान पोलिस स्टेशनला 39 वर्षीय विवाहित पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेची आरोपी राहुल श्रावण मस्के रा. न्यू खेतान नगर याच्याशी सामाजिक कार्यातून ओळख झाली. आरोपीने विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी पीडितेला मार्च 2021 मध्ये घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यादरम्यान पीडितेला  ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करणे सुरू ठेवले. यामध्ये नवऱ्याला सांगू नको म्हणून 50 हजार रुपयांची मागणी सुद्धा केली. आरोपीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने याप्रकरणी पीडितेने खदान पोलिस स्टेशन गाठून अखेर तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल श्रावण मस्के रा. न्यू खेतान नगर याच्या विरोधात भादवि कलम 323, 342, 354, 376, 384, 504, 506 34 नुसार गुन्हा दाखल केले. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनात पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

Previous articleकार झाडावर आदळली, चौघांचा जागेवर मृत्यू
Next articleजय जिजाऊ, जय शिवराय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here