वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळल्याची घटना आज सोमवारी रात्री देवरी – शेगाव मार्गावर रौंदाळा नजीक घडली आहे. या अपघातात कारचा चुराडा झाला असून यामध्ये चार युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. अकोट ग्रामीण पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, दहीहंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत घटनास्थळी पोहोचले असून मृतकांचा शोध सुरू आहे.