मंगेश फरपट
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : पर्यावरण रक्षण व पुष्प सृष्टीच्या वैभवासाठी कार्यरत व सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या अकोला गार्डन क्लबची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सेवाभावी अजय सेंगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर सचिवपदी अनेक संस्थांवर कार्यरत असणारे विजय जानी यांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श कॉलनी परिसरातील खंडेलवाल लॉन येथे रविवारी संपन्न झालेल्या वार्षिक आमसभेत गार्डन क्लबची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली. गार्डन क्लबचे मावळते अध्यक्ष विजय ढवळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या वार्षिक आमसभेत खेळीमेळीने कार्यकारणी गठीत करण्यात आली.यात निवडणूक अधिकारी म्हणून क्लबचे सदस्य विलासराव देशपांडे उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून अजय सेंगर , सचिव विजय जानी, उपाध्यक्ष जयप्रकाश पाटील, सहसचिव शरद कोकाटे, संजय शर्मा, कोषाध्यक्ष सुनील कवीश्वर तथा सदस्य म्हणून सौ.वैशाली पाटील, चंदना जैन, सुधीर राठी,सौ अर्चना सापधरे,दिनेश पारेख आदी कामकाज बघणार आहेत.यावेळी मावळते अध्यक्ष विजय ढवळे यांनी क्लबचा गत 3 वर्षाच्या कार्याचा गोषवारा सादर केला.तर नूतन सचिव विजय जानी यांनी क्लबच्या आगामी उपक्रमाची माहिती दिली.करोना संकटामुळे होत असलेली गार्डन क्लबची वार्षिक प्रदर्शनी रद्द करण्यात आली असून संकट टळल्यावर नव्या पद्धतीने गार्डन क्लबची दोन दिवशीय पुष्पप्रदर्शनी घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.नूतन अध्यक्ष अजय सेगर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानीत सर्वांना सोबत घेऊन नवी टीम सृष्टी वैभव वाढविण्याचे जोमाने कार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.संचालन व आभार शरद कोकाटे यांनी केले.खेळीमेळीत संपन्न झालेल्या या वार्षिक आमसभेत गार्डन क्लबचे हेमंत चौधरी,हेमेंद्र राजगुरू,सुषमा गायकी,जगन्नाथ कराळे,पुरुषोत्तम गुप्ता,संजय पिंपळकर,संजय धाबलिया,रवी खंडेलवाल,सुधीर रांदड,हेमंत शहा,आलोक खंडेलवाल,संजय हेडा,धर्मेंद्र केला,ओमप्रकाश गोयनका,प्रदीपसिंह राजपूत,नरेश अग्रवाल,रवि चांडक,प्रा मुकुंद सपकाळ,ओमप्रकाश चांडक,रमन राठी,भारती शेंडे,कोकिळा पाटील,अर्चना तळोकार,प्रा शारदा बियाणी,रवी खंडेलवाल,दिपक खंडेलवाल,रवी चांडक,प्रतिभा मानधने,सुनीता शर्मा, माया राठी,अलका सेंगर,संगीता मालानी, वीणा कुलकर्णी,संतोष पंजवानी,कृष्णा पंजवानी,प्रदीप मालानी,नरेश अग्रवाल,प्रकाश लोंढिया,गजानन कुलकर्णी,निशिकांत बडगे,संजय गांगर्डे,पराग शहा समवेत इतर सदस्य उपस्थित होते.
———————–