कोविडःआरटीपीसीआर ८५ तर रॅपिड ॲन्टीजेन पाच पॉझिटीव्ह

0
230

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५२६ अहवाल प्राप्त झाले. त्यात ७० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून १५ जणांचे असे एकूण ८५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दरम्यान काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१७१(४३४९६+१४४४९+२२६) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३४७२२० नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४३५२९ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२८९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३४७२२० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३०३७२४ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर ८५ पॉझिटीव्ह
आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात ७० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात २२ महिला व ४८ पुरुष रुग्ण आहेत. त्यातील ४७ जण हे अकोला शहरातील, १९ जण मुर्तिजापुर येथील तर चार जण अकोट येथील रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात १५ जणांचा असा ८५ जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
२६७ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१७१(४३४९६+१४४४९+२२६)  आहे. त्यात ११४२ मृत झाले आहेत. तर ५६७६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २६७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः२११ चाचण्यात ‘पाच’पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.७) दिवसभरात झालेल्या २११ चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काल दिवसभरात  अकोला ग्रामिण येथे दोन, अकोट येथे आठ, बाळापूर येथे एक, अकोला महानगरपालिका क्षेत्रात १००, आरोग्य कर्मचारी ३५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४२, हेडगेवार लॅब येथे २३ अशा एकूण २२७ चाचण्या झाल्या. त्यात हेडगेवार लॅब मधील अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

Previous articleस्वार्थासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस सरकारचा निषेध
Next articleअकोला गार्डन क्लबची कार्यकारिणी गठित! अध्यक्षपदी अजय सेंगर तर सचिव पदी विजय जानी यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here