पहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद, ऑनलाईन वर्ग होणार

0
654

मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा- जिल्हयातील शहरी व ग्रामिण क्षेत्रामध्ये असणा-या पहिली ते आठवी  पर्यंतच्या सर्व प्रकार्चाय शासकीय, निमशासकीय व खासगी शाळा (प्राथमिक व माध्यमिक) 31 जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष अध्ययन पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोविड 19 च्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्ययन कार्य सुरु ठेवावे असेही जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी स्पष्ट केले आहे.
इयत्ता 9 वी व पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी आरटीपीसीआर किंवा रॅपीड टेस्ट करण्यात यावी. शाळेमध्ये सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशन व मास्क वापर करणे तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. या कालावधीत शाळेमध्ये शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे. जेणेकरून शिक्षणाचे कार्य अविरत सुरु राहील. शिक्षकांनी 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने पुर्ण करून घ्यावे. बुलडाणा जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील.
.. तर होईल फौजदारी गुन्हा दाखल
जिल्हयात कुठेही शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार संबधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहतील.

Previous articleदारू दुकानवरील ‘वाईन’ अक्षर हटवा ! – किसान बिग्रेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांचा इशारा
Next articleस्वार्थासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस सरकारचा निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here