नवरात्री विशेष..
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
आपल्या कर्तृत्वाने इतिहासात अजरामर झालेल्या अनेक महानायिका आपल्या देशात होवून गेल्या आहेत. या महानायिकांना नमन आणि आजच्या महिला अधिका-यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ही संकल्पना आम्ही अकोलेकर च्या वतीने साकारण्यात आली आहे तर वेशभूषा सौंदर्यतज्ज्ञ शरद भुयार यांनी केली आहे.
महानायिकेच्या वेशभूषेतील फोटो
आजच्या महानायिका मुक्ता साळवे
आपल्या देशातील जातीयतेबद्दल इंग्लंडच्या राणीला पत्र पाठवून देशातील स्पृश्या-स्पृश्य आणि वर्णव्यवस्थेचे वास्तव मांडणा-या मुक्ता साळवे.
त्यांची वेशभुषा साकारली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी. कोरोना काळात शाळा बंद असतांनाही, शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.