नवरात्री विशेष..
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
आपल्या कर्तृत्वाने इतिहासात अजरामर झालेल्या अनेक महानायिका आपल्या देशात होवून गेल्या आहेत. या महानायिकांना नमन आणि आजच्या महिला अधिका-यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ही संकल्पना आम्ही अकोलेकर च्या वतीने साकारण्यात आली आहे तर वेशभूषा सौंदर्यतज्ज्ञ शरद भुयार यांनी केली आहे.
महानायिकेच्या वेशभूषेतील फोटो
आजच्या महानायिका महाराणी ताराबाई …
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वत: रण मैदानात उतरून मुघलांशी युद्ध करणा-या आणि औरंगजेबाला शिकस्त देणा-या महाराणी ताराबाई यांची वेशभूषा साकारली आहे, सर्वोपचार रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार यांनी. डॉ. वंदना पटोकार यांचेकडे जिल्हा शल्य चिकित्सक ही जबाबदारी असून देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्त्रियांना त्रास होवू नये म्हणून अकोट, मुर्तिजापुर, बाळापुर येथे त्या स्वतः जाऊन प्रसूती शस्रक्रिया करतात.