खामगाव न.प. पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार

0
325

अवैध नळ कनेक्शन जोडणाऱ्यांना अभय; शंकर नगरातील प्रकार

खामगाव: नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू असून अवैध नळ कनेक्शन जोडणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे दिसून येते. तर शहरातील शंकर नगर घरकुल भागात अवैध नळ कनेक्शन जोडणी सुरू असताना पाणी पुरवठा विभागाचे सुपरवायझर ठाकूर यांना काही नागरिकांनी फोन करून माहिती दिली तरी त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतल्या गेली नाही.
त्यामुळे न.प. कडे रीतसर पैसे भरून व नियमित पाणी करपट्टी भरणाऱ्या नळ कनेक्शन धारकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच काही भागात दोन पाईप लाईन असल्याने मर्जीच्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे लवकर नळ सोडून २ ते अडीच तास उशिरा बंद करण्यात येतात तर पाणी करपट्टी भरून सुद्धा कमी वेळ नळ सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आधीच पावसाळ्यातच ८ ते १० दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येतो आणि तो पण पाऊण ते एक तासात बंद करण्यात येतो आणि तक्रार केल्यास तक्रार करण्याऱ्या व्यक्तीलाच वेठीस धरल्या जाते. त्यामुळे या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अजबगजब कारभाराकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous articleबंद शाळेत मसन्या उदच्या तीन पिल्लांचा हैदोस
Next articleमनसेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक पाटील तर खामगाव शहराध्यक्षपदी आनंद गायगोळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here