जलजीवन मिशन मध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ग्रामसभेतून “जन”संवाद

0
284

२ ऑक्टोबरच्या ग्राम सभेत जल जीवन मिशन बाबत जनजागृतीपर चर्चा
आदर्श आचार संहिता लागू नसलेल्या ग्रामपंचायत मध्ये करावे आयोजन

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटूंबांना नळाद्वारे शाश्वत स्वच्छ, शुद्ध आणि प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी देण्याचे उदिष्ठय आहे. ते उदिष्ठय साध्य करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांत जनसहभाग वाढून लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे याकरिता 2 ऑक्टोबर 2021 रोजीच्या ग्रामसभेमध्ये “ पाणी स्वच्छता व आरोग्य (wash) प्रबुध्द गाव ” या उदेश्यास पुढे ठेवून जनजागृती करण्यात येणार आहे. राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या बाबत निर्देश दिले आहेत. यावेळी आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोविड 19 चे नियमांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी जल जीवन मिशन मध्ये आपला सहभाग वाढवून लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौरभ कटीयार यांनी केले आहे.
२ ऑक्टोबरच्या ग्राम सभेमध्ये ग्राम पंचायत, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, पाणी समिती यांच्या जाणीव जागृतीवर भर देऊन पाणी पुरवठ्याची व्यवस्था पुढील 30 ते 40 वर्ष टिकेल यासाठी प्रयत्न करावयाचे आहे. सध्या स्थितीत जेथे ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती नसेल अशा ठिकाणी 50 टक्के महिला आणि समाजातील दुबळ्या घटकांचे प्रतिनिधीत्व घेऊन पाणी समिती स्थापन करून सहभाग घेणे, पिण्याच्या स्त्रोतांसदर्भात जागृती करणे, जेथे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता पुर्वक उपलब्धतता असेल अशा ठिकाणी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना तर मुबलक मात्र दुषीत पाणी असलेल्या ठिकाणी योग्य त्या जलशुध्दीकरण प्रक्रिया केंद्राचा वापर करणे, पाणी टंचाई असणाऱ्या भागांमध्ये मुबलक पाणी असलेल्या भागातून “ बल्क वॉटर ट्रान्सफर ” चे नियोजन करणे, डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बहुल वाड्या, वस्त्या, पांडे, तांडा, गावे यांचेकरिता दुरूस्ती घटकांचा विचार करायचा आहे.
प्रत्येक गावाचा पाच वर्षासाठी कृती आराखडा तयार केला जावा. यामध्ये स्त्रोत बळकटीकरण, गावातील पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा व्यवस्थेची देखभाल दुरूस्ती तसेच गावातील “ एकही घर न वगळता ” प्रत्येक कुटूंबास नळाद्वारे पुरेसा व नियमित पुरवठा केला जाईल याची माहिती देण्यात येणार आहे. सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी 15 व्या वित्त आयोगातून “ पाणी व स्वच्छता ” यांना राष्ट्रीय प्राधान्य मानले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्या गावांचे गावकृती आराखडे आधीच तयार झाले असतील असे गाव पाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने या आराखड्यामध्ये काही सुधारणा आवश्यकता असल्यास करणे, नळाद्वारे स्वच्छ शुध्द पाणी पुरवठ्याचे महत्व, त्यांचा सुयोग्य वापर, मिळणाऱ्या पाण्याचा वापर व सांडपाणी व्यवस्थापन यांचा पुरस्कार करणे, पाणी पट्टी वसुली, तक्रार निवारण, पाणी गुणवत्ता तपासणी व संनियंत्रण ह्या विषयी माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
पाणी व स्वच्छता आरोग्य (WASH) यांचे महत्व अधोरेखीत करणे तसेच शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत तसेच इतर शासकिय कार्यालये यांना नळ जोडणी व पाणी उपलब्धता सुनिश्चित करणे, प्रत्येक गावात सक्रीय 5 महिलांना पाणी गुणवत्ता तपासणीसाठी प्रशिक्षीत करणे, स्वच्छता सर्वेक्षण करणे व त्याची माहिती IMIS प्रणालीवर अपलोड करणे, प्रयोगशाळेतून पिण्याच्या पाणी तपासणी करून सर्वांना शुध्द पाणी पुरवठा करणे, कौशल्य विकासाचे महत्व लोकांना पटवून देणे आणि गावपातळीवरील लोकांचे कौशल्य विकसीत करणे,गावामध्ये कार्यरत असणाऱ्या अंमलबजावणी सहाय्य संस्थांची गावकऱ्यांना ओळख करून देणे. सन 2021-22 मध्ये स्विकृत AAP मध्ये गावासाठी मान्य योजनेच्या तपशील VWSC सक्षम प्रस्तुत करणे, गावकृती आराखडा IMIS वर अद्यावत व 100 टक्के उदिष्ठ्य पुर्ती सुनिश्चीत करणे,जल स्त्रोतांचा आढावा व भूजल स्तर वाढविण्यासाठी व तलावात पावसाचे पाणी संकलन करण्यासोबतच देखभाल दुरुस्ती आणि पाणी पट्टी वसुलीसाठी उपाय योजना करण्याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. ग्राम सभेच्या माध्यमातून नारिकांना मिळणाऱ्या माहिती द्वारे जल जीवन मिशन मध्ये आपला सहभाग वाढवून लोकचळवळीसाठी सहकार्य करावे असे आवाहन अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सौरभ कटीयार यांनी केले आहे.

Previous articleबुलडाण्यात गेल्या 6 वर्षांत 30 जणांना जलसमाधी!
Next articleअकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात कन्यादिन साजरा ; 51 मातांचा बेबी कीट देऊन सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here