व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे, या अंतर्गत जिल्ह्यात 5 सप्टेंबररोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे मार्गदर्शनात स्वच्छता संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी जिल्ह्यातील ग्रामसेवक व विस्तार अधिकारी सर्व यांचेसोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी गावस्तरावर आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देत यामध्ये प्रत्येक ग्राम पंचायतीने सहभागी व्हावे व उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन केले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जल जीवन मिशन दोन्ही कार्यक्रमाची रूपरेषा, ग्रामपंचायतची भूमिका व लोकसहभागाचे महत्व याची विस्तृत माहिती दिली.
या ऑनलाइन कार्यक्रमाला गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राजेश डहाके, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अर्चना डोंगरे, मूल्यमापन व संनियंत्रण सल्लागार राहुल गोडले, अभियांत्रिकी तज्ञ सागर टाकले, लेखापाल प्रल्हाद पाखरे, सल्लागार आदी उपस्थित होते. तज्ञ उपस्थित होते.