यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय
व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगाव : पारंपारिक विद्यापीठातून बि.एस्सी. ची पदवी करतांना काही कारणास्तव विद्यार्थी प्रथम किंवा द्वितीय वर्षापासून आपली पदवी पूर्ण करू न शकल्यास ती अर्धवट राहिलेली पदवी पूर्ण करण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठाने नुकताच एक निर्णय केला असून जे विद्यार्थी पारंपारिक म्हणजेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ किंवा इतर पारंपारिक विद्यापीठामध्ये बि.एस्सी. मध्ये प्रवेशीत होता परंतु काही अडचणी मुळे पुढील द्वितीय किंवा तृतीय वर्षाचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे अश्या विद्यार्थ्यांना आता आपली बि.एस्सी. ची पदवी पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. मुक्त विद्यापीठाने घेतलेल्या या अभूतपूर्व निर्णयाचा लाभ विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन केंद्र प्रमुख, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांनी केले आहे. तसेच महाविद्यालयामध्ये मुक्त विद्यापीठाद्वारे शिकविण्यात येणार्या बि.ए., बि.कॉम., एम.ए. इंग्रजी, एम.कॉम. एम.बि.ए. एम.एस्सी. गणित या अभ्यासक्रमाला सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमास प्रवेशकरिता अधिक माहितीसाठी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, वामन नगर खामगाव येथे किवा 7038609879 / 07263295566 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.