स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीमेत सहभागी व्हा; मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

0
295

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर रोजी स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम गाव स्तरावर राबविण्यात यावी आणि या मोहिमेमध्ये ग्रामस्थ, गाव स्तरावरील कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सौरभ कटियार यांनी केले आहे.
श्रमदान मोहिमेमध्ये ग्रामपंचायत हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी आवश्यक कामे जसे. सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करणे, वैयक्तिक शोषखड्डा, सार्वजनिक शोषखड्डे व खत खड्ड्यांचे बांधकाम करणे आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी यावेळी श्रमदान करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान covid-19 आणि निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना श्री कटियार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या कालावधी एकदा वापरण्यात येणारे प्लास्टिक, (सिंगल युज प्लास्टिक) बंदीबाबत ग्रामपंचायत ने दिनांक 20 सप्टेंबर रोजी कार्यवाही करणे, गाव हागणदारी मुक्त अधिक ( ओ डी एफ प्लस ) घोषित करण्यासाठी तारीख निश्चित करणे, 25 सप्टेंबर रोजी सरपंच संवाद, 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करणे, ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ ग्रही, स्वच्छता प्रेरक व स्वच्छतेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्याचा सत्कार करणे आदी उपक्रम या मोहिमेदरम्यान राबवले जाणार आहे.

Previous articleकुटूंब नियोजन शस्त्रक्रियेत आरोग्य विभाग नापास
Next articleस्वच्छतेच्या यज्ञात अनेकांनी टाकल्या समिधा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here