व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे, यामुळे नदी नाल्याना मोठा पूर आला आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील पूर्णेला मोठा पूर आला असल्याने अकोला अकोट मार्गवारील गांधीग्राम च्या पुलावरून पाणी वाहतेय. नागरिकांना पोलीस स्टेशन दहीहंडा तर्फे जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, अकोला येथून अकोट कडे जाणाऱ्या तसेच अकोट येथून अकोला कडे येणाऱ्या नागरिकांनी आजच्या दिवशी आपला प्रवास टाळावा असे आवाहन ठाणेदार सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.
मदतीसाठी संपर्क: ८८८८१७३७५६ (सुरेंद्र राऊत, ठाणेदार, दहिहांडा)