वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
नागुपर: पारशिवनी तालुक्यात हे तरुण पोहण्यासाठी नदीत गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तरुण बुडाले. पाचही तरुणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे.
नदीला प्रवाह जास्त असल्या कारणाने पारशिवणीच्या तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी एसडीआरएफ पथकाची मागणी केलेली आहे. मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत.