अडीच हजार विद्यार्थ्यांनी नाकारली एमपीएससी परिक्षा

0
247

अकोल्यात 6 हजार 269 परिक्षार्थ्यांनी दिली राज्यसेवा पूर्व परीक्षा

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.4) रोजी जिल्ह्यात महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा 33 उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण 8 हजार 852 परिक्षार्थी पैकी 6 हजार 269 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित होते. तर 2 हजार 483 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
एमपीएससी परिक्षेकरीता कोविड प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आले होते. परिक्षेकरीता उपस्थित परिक्षार्थींना तसेच परिक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅनिटायर, फेसशिल्ड इत्यादी साहित्य पुरविण्यात आले होते. परिक्षाकरीता आलेल्या प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग व परीक्षा केंद्र सॅनिटाईझ करण्यात आले होते.
एमपीएससी परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले. तर उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, भुसंपादन अधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहायक संचालक दि.अ.जवंजाळ, तहसिलदार बळवंत अरखराव यांनी परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून काम पार केले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन कदम यांनी काम पाहिले.

Previous articleपाळीव अतिक्रमण अन् मोकाट प्रशासन..
Next articleभिषण अपघातात दोघे ठार, 2 गंभीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here