आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार –  बाळासाहेब थोरात

0
362

व-हाड दूत न्युज नेटवर्क
प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेचे काय ?
बुलडाणा: काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  मांडल्याने प्रदेशाध्यक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या वक्तव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भूमिकेच्या विरोधात सदर व्यक्तव्य असल्याने काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होताना दिसत आहे.
गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बाळासाहेब थोरात शनिवारी शहरात होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीत सहभागी पक्ष एकत्रित लढणार. महत्वाचे म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी निवडणूका स्वब‌ळावर लढणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वेगळे वक्तव्य केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पटोले आणि थोरात वेगळा सूर लावत असल्याचे दिसत आहे. या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोणती भूमिका जाहीर करतात. याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous article” गाव निघालं शिकायला”! अभियानाचा प्रारंभ
Next articleकुपोषण घालवू धरु सुपोषणाची संगत, स्थानिक आहाराची झडू दे पंगत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here