वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार 2019- 20 हा व्याख्याते, लेखक शिवाजी भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व युवा धोरणाच्या कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील युवाकांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 2019-20 या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार शिवाजी भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांना गौरवपत्र, सम्मानचिन्ह व रोख रक्कम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.