अकोल्याच्या प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

0
373

बुलडाणा: अकोला जिल्ह्यातील प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शेगाव तालुक्यातील नागझरी येथील नदीच्या पुलाजवळ शनिवारी सकाळी घडली.
डोंगरगाव ता. बाळापूर जि. अकोला येथील अल्पवयीन मुलगी गौरी गजानन सुलताने वय १६ व मुलगा भागवत मधुकर वाघमारे वय २० यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच शेगाव रेल्वेपोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. प्रेमीयुगुलाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे करण्यात आले. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.

Previous articleबुलडाणा जिल्ह्यात आज 151 पॉझिटिव्ह
Next articleबुलडाणेकरांनो सावधान: कोरोनाचा धोका वाढतोय! आज १८४ पॉझिटिव्ह, आतापर्यंत ८४ लोकांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here