नियमांचे उल्लंघनप्रकरणी हॉटेलसह मंगल कार्यालयावर कारवाई करा; हरीत लवादचे जिल्हा प्रशासनाला आदेश

0
207

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: प्रदुर्षण टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत नियम मोडणा-या शहरातील शगुन हॉटेलसह उत्सव मंगल कार्यालय व स्वातंत्र्यविर सावरकर सभागृह या तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करण्याचे निर्देश हरित लवादने दिले आहेत. कारवाई करून तसा अहवालही 31 ऑगस्टपूर्वी पाठवण्यात यावा असा महत्वपूर्ण आदेश राष्ट्रीय हरीत लवादचे अध्यक्ष न्या.आदर्शकुमार गोयल, न्यायीक सदस्य न्या.सुधिर अग्रवाल, न्या.एम. सत्यनारायण आणि तज्ञ सदस्य डॉ.नगीन नंद यांनी दिला आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, राष्ट्रीय हरीत लवादाकडे दिपक रामभाऊ गावंडे यांनी 2019 मध्ये याचीका दाखल करुन अकोला शहरातील जठारपेठ भागातील शगुन हॉटेल, उत्सव मंगल कार्यालय व विर सावरकर सभागृह या प्रतिष्ठानांकडून वायू प्रदूर्षण, जल प्रदूर्षण, ध्वनी प्रदूर्षण आणि इतर माध्यमातून पर्यावरणाला हानी पोहचवली जात असल्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 23 जुलै 2020 रोजी दिलेल्या आदेशावर 2021 रोजी पुरवणी याचिका दाखल केली होती.या याचिकेवर सुनावणी होवून अकोल्यातील शगुन हॉटेल, उत्सव मंगल कार्यालय व स्वातंत्र्यविर सावरकर सभागृहाकडून सातत्याने नियम भंग होत असल्याने, राज्य प्रदूर्षन नियंत्रण मंडळ सदस्य, अकोला जिल्हा दंडाधिकारी व अकोला महानगर पालिका आयुक्त यांची संयुक्त समिती गठीत करावी. यामध्ये एका नोडल एजन्सीला समन्वयक ठेवून संबंधितांचे स्पष्टीकरण ऑनलाईन घेवून नोडल एजन्सी आणि संयुक्त समितीने प्रत्यक्ष स्थळावर जावून पाहणी करत कारवाई करावी. या तीन प्रतिष्ठानांवर केलेल्या कारवाईचा अहवाल 31 ऑगस्टपर्यंत पीडीएफ किंवा ओसीआरच्या माध्यमातून लवादाकडे पाठविण्यात यावा. यासोबतत पाणी कायदा 1974, वायू कायदा 1981 तसेच पर्यावरण स्पष्टीकरण व मार्गदर्शक तत्वे, प्रदूर्षन अधिनियमांतर्गत सर्व परवानग्या घेवून हवा, पाणी, ध्वनी वेस्ट मटेरियल, जनरेटर, अंडरग्राऊंड वाटर सर्विस, लिगल ग्राऊन वाटर अँक्ट्रॅक्शनसह पर्यावरण वायलेशन संदर्भाने या तिन्ही प्रतिष्ठानांनी केलेल्या सर्व उपाययोजनांची लोकांना माहिती होईल व वाचता येईल अशा जागेवर माहिती फलक लावावा असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाने शहरातील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Previous articleगाव कृती आराखडे तयार करण्यासाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणास सुरुवात
Next article‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here