पावसाने नुकसान झालंय; 72 तासात विमा कंपनीला द्या माहिती

0
764

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीचे पूर्वसूचना 72 तासाच्या आत विहित मार्गाने विमा कंपनीस देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना एचडीएफसी इर्गो विमा कंपनीकडून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते. जिल्ह्यात मागील काहि दिवसात झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. पिक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे नैसर्गिक किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर बांधित पिक व क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप किंवा एचडीएफसी इर्गो विमा कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर तसेच बँक, कृषि व महसूल विभाग यांच्याकडे संपर्क साधावा. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक राहील. नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीबाबतची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या दरम्यान वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे (Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका, जिल्हा कार्यालयात किंवा कृषि, महसूल विभागास देणे आवश्यक राहील. याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषि अधिकारी, विमा कंपनी जिल्हा व तालुका प्रतिनिधी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी, संबंधित बँक यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कांतप्पा खोत यांनी कळविले आहे.

Previous articleरोबोटिक्सने 18 मुलींना दिली आंतरराष्ट्रीय ओळख
Next articleकाय सांगता: आंघोळ करतानाचे महिला पोलीसाचे काढले फोटो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here