व-हाड दूत न्युज नेटवर्क
मेहकर : जिजाऊ ब्रिगेडच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी अर्चनाताई बोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपद विद्याताई जाधव यांना देण्यात आले आहे. या दोघींची नियुक्ती जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई जाधव यांनी नियुक्तीपत्रक देऊन केली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष उर्मिलाताई हाडे, सिंदखेडराजा शहराच्या कार्याध्यक्ष रंजनाताई देशमुख, उज्वला वानखेडे, सरस्वती वाळुकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करुन जिजाऊ वंदना गाऊन करण्यात आली.
अर्चनाताई बोरे यांनी आतापर्यंत विविध सकारात्मक पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीपणे केले आहे. जिजाऊ ब्रिगेड अकोला शहराच्या प्रसिद्धीप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतलेला आहे. त्यांचे हे कार्य पाहून वरिष्ठांनी त्यांच्यावर मेहकर तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्याताई जाधव यांची लहानपणापासूनच परिवर्तनवादी चळवळीमध्ये जडणघडण झाल्याने त्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.