व-हाड दूत न्युज नेटवर्क
खामगांव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगांवच्या प्राचार्यपदी डॉ. डी. एस. तळवणकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांवचे डॉ. सुभाष बोबडे यांनी डॉ. डी. एस. तळवणकर यांना पुनर्नियुक्ती चे पत्र दिले. डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या कार्यकाळ ३० जून रोजी पांच (5) वर्षे पूर्ण करून संपला होता. डॉ. डी. एस. तळवणकर यांची प्राचार्यपदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण पसरले होते. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. प्रशांत बोबडे (सचीव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव), प्रा. डॉ. एम ओ. वानखडे, प्रा. डॉ. आर. आर. गव्हाळे, प्रा. डॉ. एस. टी. वराडे, प्रा. एन. बी. कुटेमाटे, प्रा. डॉ. मोहम्मद रागीब डॉ. तालीब देशमुख, प्रा. डॉ. ए. व्ही. पडघन, प्रा. डॉ. जी. बी. काळे, प्रा. डॉ. आर. पी. सोनेकर, प्रा. डॉ.एच. एस. चांडक, प्रा. के. के. पठाण, प्रा. डॉ. पी. ई. अजमिरे, प्रा.पी. एस. बोडखे, प्रा. डॉ. पी. व्ही. उबाळे, प्रा. डॉ. व्ही. एस. अठवार, प्रा. डॉ. व्ही. एम. देशमुख, प्रा. डॉ. एच. डी. आकोटकर, प्रा. डॉ. एस. एन. खडसे, प्रा. डॉ. ए. झेड. ताजी, प्रा. डॉ. व्ही. आर. गव्हाळे, प्रा. डॉ. ए. डी. भोसले, प्रा. डॉ. एम. एस. गायकवाड, प्रा. एस. व्ही. जाधव,प्रा. डॉ. एच. ए. भोसले, प्रा. डॉ. पी. पी. ठाकूर, प्रा. एस एन शिंगणे, यांच्यासह प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्यपदी पुनर्नियुक्ती झाल्या बद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.