मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: हरित क्रांतीचे जनक स्व.वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधत वनपरिक्षेत्र जळगाव जामोद अंतर्गत अलमपूर येथे मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेशभाऊ एकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून भविष्यात ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येऊ नये याकरिता एक व्यक्ती एक वृक्ष या अनुषंगाने वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घ्यावा अशी भावना यावेळी आमदार राजेशभाऊ एकडे यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पुनर्वसन समिती चे सदस्य पुरुषोत्तम झाल्टे, तहसीलदार राहुल तायडे, प्रादेशिक वनपरिक्षेत्र जळगाव जामोदच्या आर.एफ.ओ.राजहंस मॅडम, गटविकास अधिकारी समाधान वाघ, निमगावचे सरपंच दिनकर कुवारे, उपसरपंच सुनील दळवी, अलमपूर च्या सरपंच नंदाताई ठोंबे, कृष्णकांत सुशीर, राजेश सुलतान, रमेश पायघन, किसन भगत, विकास फलके, ग्रामसेवक प्रशांत जामोदे, श्री.जाधव स्थानिक ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.