सरकार घराण्यातील उच्यशिक्षित व्यक्तिमत्व गेले; डॉ. रामदास भोंडे यांचे निधन

0
264

व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात ज्या कुटुंबाने दमदार ठसा उमटवला त्या भोंडे परिवारातील उच्चशिक्षित डॉक्टर रामदास भोंडे यांचे आज निधन झाले. संगम तलाव येथे सकाळी पोहोण्यासाठी गेले असता तेथे त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
उच्चशिक्षित आणि धनिक असूनही डॉ. रामदास भोडे कायम साधे राहिले. मनाचा अत्यंत उमदा माणूस .गर्व अहंकार जराही लवलेश नाही. तोरणदारी मरणदारी दुसर्‍याच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा जणू त्यांना छंद होता. सावडणे, र्मौत आदीसाठी ते जिल्हाभर फिरायचे, व्यस्त जीवनशैलीत ते वेळ काढत होते हे विशेष.
डॉ.  रामदास भोंडे यांची विशेष आठवण येते ती 1990 च्या विधानसभा निवडणुकी साठी. या निवडणुकी ने जिल्ह्याचा राजकीय इतिहास बदलला. जिल्ह्यात सहकारामध्ये प्रचंड दबदबा असलेले सहकार महर्षी भास्करराव शिंगणे बुलढाणा विधानसभा निवडणुकीसाठी उभे होते. एकूण 22 उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते डॉक्टर राजेंद्र गोडे तर डॉक्टर रामदास भोंडे यांनी जनता दलाच्या माध्यमातून ऐनवेळी निवडणुकीत एंट्री घेतली. काँग्रेस शिवसेना जनता दल अशा लढतीत डॉक्टर राजेंद्र गोडे यांचा विजय झाला असला तरी डॉक्टर भोंडे यांनी मारलेली राजकीय मजल लक्षवेधी ठरली.
जिल्हा रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. वागण्या-बोलण्यात सुसंस्कृत आणि घरंदाजपणा असणारा निर्मळ माणूस निघून गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्र ढवळून निघाले आहे.
भोंडे परिवाराचे जिल्ह्याच्या इतिहासात मोठे राजकीय योगदान आहे. श्रीराम देवसिंग भोंडे 1970 मध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. एखाद्या मंत्रिपदाचा सारखेच हे पदाचा दबदबा . .
तर रामसिंग देवसिंग भोंडे यांच्या रूपाने बुलढाणा शहरास पहिला बहुजन नगराध्यक्ष मिळालाहोता. पुढे ते आमदार झाले. 1975 मध्ये ते आमदार असताना तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या हस्ते बुलढाणा बसस्थानक आणि येळगाव धरणाचा भूमिपूजन पार पडले. त्यावरच आज बुलढाणा आणि 35 गावांची तहान भागविली जाते.धाड येथे सहकारी साखर कारखाना आणण्यासाठी भोंडे सरकार यांनी मोठे प्रयत्न केले होते. तर बाळाभाऊ भोंडे यांनी जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ अध्यक्ष पद भूषविले. रामसिंग देवसिंग भोंडे यांचा उल्लेख – –सरकार- – असा केला जायचा. बुलढाण्यातील भोंडे सरकार चौक आजही त्याची साक्ष देतो .
याच सरकार घराण्यातील उच्चशिक्षित डॉ. रामदास भोंडे या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाला आज आपण मुकलो.
साहेबांना भावपूर्ण अभिवादन!

✍️ गणेश निकम केळवदकर
मो.क्र. 9923179040

Previous articleबुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांचा पिकविमा तात्काळ अदा करा- आ. राजेश एकडे
Next articleवृक्ष संवर्धन ही काळाची गरज: आ. राजेश एकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here