संग्रामपूर : अकोला-खंडवा ब्रॉडगेज प्रस्तावित रेल्वे मार्ग संग्रामपूर- जळगाव जा. तालुक्यातून न करता अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा अशी मागणी अमरावतीच्या अपक्ष खा.नवनीत राणा यांनी काल संसदेच्या अधिवेशनात करत या आंदोलनात उडी घेतली. तर जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री व वेंâद्र सरकारला पत्र देऊन हा मार्ग वरील दोन तालुक्यातुनच करा अशी आग्रही मागणी केली. त्यामुळे रेल्वे मार्गासाठी आता या दोन खासदारांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. काल झालेल्या संसदेच्या अधिवेशनात तर या रेल्वेमार्गावर मत व्यक्त करतांना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आदीवासीच्या विरोधात असल्याचा थेट आरोप खा.नवनीत राणा यांनी केला आहे.