शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय झाल्याचा दावा
मंगेश फरपट
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा: शेतक-यांच्या पिकविमा संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चुप्पी साधली आहे. विमा कंपन्यांना पाठीशी घालत शेतकºयांवर राज्य सरकारकडून अन्याय होत आहे. जळगाव जमोद विधानसभा मतदार संघातील शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी 100 टक्के पिक विमा भरपाईमध्ये बसत असतांनाही विमा कंपन्यांनी शुल्लक त्रुटी काढत त्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. पिकविम्या संदर्भात निर्धारित केलेल्या विमा कंपन्या शेतकºयांना प्रतिसाद देत नसल्याची माहितीही जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ.संजय कुटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
येथील पत्रकार भवन येथे आज शुक्रवार 02 जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात जेव्हा भाजपाची सरकार होती. तेव्हा भाजपा सरकारने शेतकºयांना 5 हजार 795 कोटी पिकविमा दिला. ज्याची टक्केवारी 22 टक्के आहे. तर महाविकास आघाडी सरकारने केवळ 975 कोटी विमा शेतकºयांना दिला आहे. तो फक्त 18 टक्के इतकाच आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या 2 लाखाच्या वर पिकविमा लाभार्थी शेतकरी आहेत. मात्र त्यांना पिकविम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे. राज्य सरकार व विमा कंपन्यांचे साठे लोटे असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. शेगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी 100 टक्के पिक विमा भरपाईमध्ये बसत असतांनाही विमा कंपन्यांनी शुल्लक त्रुटी काढत त्यांना पिक विम्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले आहे. तर उर्वरित 10 तालुक्यात सोयाबीनचा एकही रुपया शेतकºयांना नाही. अर्ज केल्यानंतर 48 तासात नीकाली काढण्यात येतो. मात्र आता 4 महिने उलटून या शेतकºयांना न्याय मिळत नाही. शेतकरी पिकविम्याच्या संदर्भात केंद्र सरकारची भुमिका केवळ प्रिमीयम भरणे इतकीच आहे. हे सांगतांना त्यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारला पिक विमा कंपन्यांची निवड करण्याचे अधिकार आहेत. केंद्र सरकार साडेबारा टक्के व राज्य सरकार साडेबारा टक्के आणि उर्वरित रक्कम शेतकºयांना प्रिमीयमच्या रुपात भरावी लागत असते. त्यामुळे शेतकºयांना पिकविम्याची रक्कम देण्याचे काम राज्य सरकारचे आहे. मागील काळात शिवसेनेने पिकविम्यासाठी अनेक आंदोलने केलीत मात्र यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शेतकºयांच्या पिकविम्यासंदर्भात का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. यापत्रकार परिषदेला भाजपा आमदार डॉ.संजय कुटे, अरविंद होंडे, जिल्हा महामंत्री संतोषराव देशमुख, शहराध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, मंदार बाहेकर, आशिष व्यवहारे, अशोक जोशी उपस्थित होते.