पातूर व बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संलग्न

0
466

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हयातील बाळापूर व पातूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय अकोलाशी संलग्नीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतक-यांना शेतीविषयक कामासाठी अकोट उपविभागात जाण्याची गरज नाही. यासंदर्भातील शासन निर्णय शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्यव्यवसाय विभागाकडून 25 जूनरोजी प्राप्त झाला आहे. या निर्णयाने शेतक-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आतापर्यंत तालुका कृषी अधिकारी पातूर व बाळापूर कार्यालयासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय हे अकोट येथे होते. बाळापूर तालुका अकोटपासून 70 किलोमिटर व पातूर तालुका 80 किलोमिटर दूर असल्याने ते शेतक-यांसाठी गैरसोईचे होते. त्यातही दोन्ही तालुक्यातील गावांचा विचार केल्यास बहुसंख्य शेतक-यांना अकोट उपविभागीय कार्यालय हे खूप अंतरावर असल्याने संपर्काच्या दृष्टीने शेतक-यांना जिकरीचे व त्रासाचे शिवाय आर्थीक दृष्टया न परवडणारे होते. अकोल्यापासून बाळापूर तालुका हा 30 किलोमिटर तर पातूर तालुका 26 किलोमिटर दूर आहे. बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतक-यांना अकोला तालुका अकोला विभागास जोडण्याबाबतची मागणी ब-याच दिवसापासून सुरु होती. शासनाच्याही हा प्रस्ताव विचाराधिन होता. अखेर यासंदर्भात शासननिर्णय प्राप्त झाला असून तालुका कृषी अधिकारी बाळापूर व पातूर ही कार्यालये आजपासून अकोला उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयास जोडण्यात आली आहेत. अकोला उपविभागात आता 13 कृषी मंडळांचा समावेश असेल तर अकोट उपविभागात फक्त अकोट व तेल्हारा तालुक्यातील 6 कृषी मंडळाचा समावेश असणार आहे.

Previous articleकोमेजलेल्या चेहऱ्यावर उमटली आंनदाची लहर
Next articleडेल्टा प्लस: अकोला, बुलडाण्यात सोमवारपासून निर्बंध कडक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here