शैक्षणिक व स्वच्छताविषयक साहित्य वाटप; सेव्ह बचपनचा पुढाकार
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला : रस्त्याच्या कडेला फूटपाथवर साहित्य विकून चरितार्थ चालवणाऱ्या कुटुंबातील शैक्षणिक साहित्यापासून वंचित असलेल्या लहानग्याच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर शैक्षणिक व स्वच्छताविषयक साहित्य मिळाल्याने आंनदाची लहर निर्माण झाली. सेव्ह बचपन ह्या शिक्षण व आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक व स्वच्छताविषयक साहित्य वितरित करण्यात आले. लेखन, पाटी, पोषक खाऊ, अंघोळीसाठी साबण देऊन ह्या लेकरांच्या आयुष्यात आंनदी क्षण निर्माण करण्यात आले.
शहरातील अग्रसेन चौकात अनेक परिवार लाकडी खेळणी तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात. ह्या कामात कुटुंबातील चिमुकली लेकरं मदत करीत असतात. त्यामुळे शिक्षणापासून ही लेकरं दूर जातात व शाळाबाह्य होतात. अशा मुलांची शैक्षणिक आवड वाढावी म्हणून सेव्ह बचपन सातत्याने प्रयत्न करीत असते. ह्या लेकरांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, गटसमन्वयक शशिकांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गमित्र अजय गावंडे, अनिसचे शरद वानखडे, चित्रपट कलावंत, लेखक किशोर बळी, स्तंभलेखक चंद्रकांत झटाले, अकोला आकाशवाणी उदघोषिका नयना देशमुख, जागर फाउंडेशनचे संयोजक नंदकिशोर चिपडे, शिक्षक नेते गोपाल सुरे, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष मारुती वरोकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे सेव्ह बचपनचे जिल्हा समन्वयक तुलसीदास खिरोडकार, तालुका समन्वयक नरेंद्र चिमणकर, शिवाजी भोसले, प्रताप वानखडे, अर्चना भगत, सुशांत देशमुख, संघदास वानखडे, विजय ठाकरे, अनिल महल्ले, गोपाल महल्ले, अर्जुन चौधरी, अमर गजभीये यांची उपस्थिती होती.