लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे येथे ३५ वर्षीय शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे याने शेतातील गोठ्यासमोरील लाकडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे याने शेतातील गोठ्यासमोरील लाकडी खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. मृतकास २ एकर शेती व एक मुलगा, मुलगी आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळावर बिट जमादार बन्सी पवार यांनी पंचनामा केला.