जिल्हाधिका-यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट

0
352

माजी महापौराच्या मुलाला पैशांची मागणी
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून माजी महापौर अश्विनी हातवळणे यांच्या मुलाला पैशांची मागणी करण्यात आली आहे. बनावट फेसबुक अकाऊंट उघडणा-यांची मजल आता जिल्हाधिका-यांपर्यंत गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांनी पोलिसांना दिली आहे. बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे ऐकण्यात आहे. परंतु प्रशासकीय अधिका-यांच्या नावे बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तातडीचे काम असल्याचे सांगत 12 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पैसे पाठविण्यासाठी गुगल अकाउंटचा क्रमांकही देण्यात आला होता. अकोल्यातील आणखी काही प्रतिष्ठीत व्यक्तींना अशाच पद्धतीने पैशांची मागणी केल्याचे समजते.

Previous articleबियाण्यांची थैली, बिलावर शिक्के!
Next articleबुलडाण्यात पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना! मुलाकडून आईवर अत्याचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here