Home क्राइम महिला पोलिस कर्मचा-यावर अत्याचार! पोलिस निरिक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम : स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचा-यावर पोलीस निरीक्षकाने अत्याचार करून मारहाण केल्याप्रकरणी वाशीम शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरिक्षक विश्वकांत गुट्टे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर येथील पोलीस निरीक्षक विश्वनाथ गुट्टे यांनी दोन दिवसांपूर्वी वाशीम येथे येऊन जुन्या आेळखीचा फायदा घेऊन महिला पोलिसावर अत्याचार केला. आरोपी हा 2007 मध्ये मालेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्याची पिडीत महिला पोलीस कर्मचा-यासोबत आेळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत दोन दिवसांपूर्वी आरोपी वाशीम येथील घरी आला. त्याने जबरदस्ती करीत मारहाण करून अत्याचार केला, अशी तक्रार महिला पोलीस कर्मचा-याने वाशीम शहर पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून वाशीम शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अल्का गायकवाड करीत आहेत. पोलीस निरीक्षकानेच महिला पोलिस कर्मचा-यावर अत्याचार केल्याच्या घटनेने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
© All Rights Reserved