बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू तर आज १२४ पॉझिटिव्ह

0
283

बुलडाणा: कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जिल्हयातील वेगेवेगळ्या ठिकाणच्या ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३७७ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २५३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १२४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १०४ व रॅपिड टेस्टमधील २० अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १३६ तर रॅपिड टेस्टमधील ११७ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २५३ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : २२, खामगांव तालुका : घाटपुरी ४, गोंधनापुर २, बोर जवळा ११, नांदुरा तालुका: निमगाव १, नांदुरा शहर: २, मलकापूर तालुका: वाघुड १, मलकापूर शहर: ३, लोणार तालुका: पंगरा डोळे २, हिरदव २, सुलतानपूर १, लोणार शहर: १, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल ४, जळगाव जामोद शहर : ७, जळगाव जामोद तालुका : सुन गाव १, बुलडाणा शहर: २५, बुलडाणा तालुका : पांग्री २, डोंगरखंडाळा २, चांडोल १, धाड १, साखळी १, मोतला शहर : १, मोतळा तालुका : धा.बढे ४, दे.राजा शहर: ५, दे.राजा तालुका : नारायण खेड २, दे.मही २, सुरा १, धोत्रा १, कुंभारी १, पांगरी १, चिखली शहर: १, चिखली तालुका: दे.घुबे १, शेलुद १, सिंदखेड राजा तालुका: साखर- खेर्डा१, गोरेगाव १, गुंज २, मेहकर शहर : २, शेगाव शहर : १, संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात १२४ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान बुलडाणा येथील ८१ वर्षीय पुरुष, चिखली रोड, बुलडाणा येथील ६१ वर्षीय पुरुष, शेलगाव दे. ता.मेहकर येथील ७५ वर्षीय पुरुष, निमगाव ता.नांदुरा येथील ७२ वर्षीय पुरुष आणि दे.घुबे ता.चिखली येथील ४८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत २७७५३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ५१८३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ५१८३ आहे.

Previous articleमराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे 8 मोठे निर्णय
Next articleगळफास घेवून शेतकNयाची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here