अकोल्यात साकारतोय प्राणवायू यंत्र निर्मिती प्रकल्प

0
272

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाच्या महामारीत अनेक रुग्ण प्राणवायू अभावी दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या महामारीचा सामना करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला प्राणवायू तयार करण्याच्या यंत्राची निर्मिती आता अकोला नगरीत सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे निर्माते गणेश इनोव्हेशन व नेहरु पार्कचे संचालक बी. एस. देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा व रुग्णासह वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प अतिशय महागडा असल्याने प्रत्येक ठिकाणी तो तयार करणे शक्य नाही. महामारीच्या काळात प्राणवायूच्या टंचाईमुळे राज्यकर्ते, प्रशासन तथा वैद्यकीय क्षेत्र भयानक चिंतेत सापडले होते. त्यामुळे विमान, रेल्वे व टँकरद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यातून प्राणवायू आणावा लागला आहे. या सर्व संकटातून बाहेर पाडण्यासाठी हा प्रकल्प एक आशेचा किरण ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी आता नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी लागणारे कर्ज, त्यावरील व्याज, कर यात विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी खर्चात मोठी कपात होणार आहे. सोबतच वीज आकार, भूखंड व सुलभ हप्ते यामध्येही सवलती मिळणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा देणारा व उपयुक्त ठरणार आहे. या कार्यासाठी राजेश भातरकर, मोहन लांडे, कुणाल देशमुख, सुयश पाटील, मिर्झा बाबर बेग, सचिन जगताप हे परिश्रम घेत आहेत.

Previous articleपर्यावरणपूर्वक अंत्यसंस्कारासाठी ‘गोकाष्ट’चा उपाय!
Next articleराज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here