पर्यावरणपूर्वक अंत्यसंस्कारासाठी ‘गोकाष्ट’चा उपाय!

0
225

     वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

लाकडासाठी उपलब्ध केला पर्याय 
   ‘मधूवत्सल’ गोशाळेचा पुढाकार
अकोला: ग्रामीण भागात जळणासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडाकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हा ऱ्हास टाळण्यासाठी अकोल्यातील ‘मधूवत्सल’  या गोशाळेने लाकडासाठी पर्याय शोधला आहे.
ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरले जाणारे जळण आणि हिंदू धर्मानुसार मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून अकोल्यातील मधूवत्सल गोशाळेने गायीच्या शेणापासून लाकडाच्या आकाराच्या  गोकाष्ट (गौऱ्या) तयार केल्या आहेत. या गोकाष्टचा उपयोग घरात जाळल्या जाणाऱ्या इंधनाच्या स्वरूपात केला जाऊ शकतो. तसेच अंत्यसंस्कारासाठीही या गोकाष्टचा वापर केल्यास वृक्षतोडीला आळा बसेल. कोरोनाकाळात मृतांची संख्या वाढत आहे. एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी एक झाड इतके लाकूड लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा म्हणून, गोशाळेतील गायीच्या शेणाचा उपयोग करून, या गोकाष्टची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे लाकडाच्या ठिकाणी या गोकाष्टचा वापर झाल्याने, लाकडांचा वापर कमी होऊ शकेल. कोरोनाच्या या कठीण काळात याचा उपयोग प्रभावी ठरू शकेल. लाकडांशिवाय चितेची राख होऊ शकत नाही, असा समज काही लोकांचा आहे. त्यामुळे या गोकाष्टचा उपयोग सहसा टाळला जातो. आता गोकाष्टचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यास सुरूवात झाली असून, हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे या गोशाळेच्या संचालकांनी सांगितले.

Previous articleबुलडाणा: आता दुपारी 2 पर्यंत मिळतील जीवनावश्यक सेवा
Next articleअकोल्यात साकारतोय प्राणवायू यंत्र निर्मिती प्रकल्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here